मुंबई बँकेच्या मोबाईल बँकिंग सेवेचा उदघाटन सोहळा

    27-Nov-2024
Total Views |
Mumbai Bank

मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ग्राहक, खातेदार, संस्था पदाधिकारी आणि सभासदांसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. डिजिटल बँकिंग क्षेत्रात क्रांती करण्यासाठी मुंबई बँक सज्ज झाली आहे. ग्राहक व सभासदांसाठी मुंबई बँकेने ( Mumbai Bank ) मोबाईल बँकिंग सेवा उपलब्ध केली आहे. या बँकिंग सेवेचा उदघाटन सोहळा उद्या गुरुवार, २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या फोर्ट येथील पद्मश्री वसंतदादा पाटील सभागृह येथे होणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष आणि भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी दिली. तसेच या सोहळ्याला मुंबई बँकेच्या सभासदांनी, संस्थांच्या पदाधिकारी व खातेदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही आ. दरेकर यांनी केले आहे.