“कारकिर्दीच्या सुवर्णमहोत्सवी टप्प्यावर जीवनगौरव पुरस्कार मिळण्याचा आनंद” मृद्गंध पुरस्कार सोहळ्यात पुरुषोत्तम बेर्डे यांनी व्यक्त केल्या भावना

27 Nov 2024 15:37:43
 
mrudgandh
 
२७ नोव्हेंबर, मुंबई : “माझ्या कारकिर्दीच्या सुवर्णमहोत्सवी टप्प्यावर हा पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. कार्यरत असताना मिळालेला हा जीवनगौरव अजून चांगले काम करायला बळ देणारा आहे” अशा भावना लेखक-दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी मृद‌गंध जीवनगौरव पुरस्कार स्विकारताना व्यक्त केल्या. विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे ‘मृदगंध पुरस्कार’ वितरणाचा सोहळा मंगळवार २६ नोव्हेंबर रोजी काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे येथे सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात बोलताना पुरुषोत्तम बेर्डे पुढे म्हणाले “खंडोबाचं लगीन’ या नाटकादरम्यान लोकशाहीर विठ्ठल उमप यांची ओळख झाली आणि आज त्या नाटकातील काही मंडळीच्या साक्षीने हा पुरस्कार मिळतोय हा वेगळा आनंद सुद्धा आहे.”
 
आपले अवघे आयुष्य लोककलेसाठी समर्पित करणाऱ्या संगीत नाटक अकादमी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘मृद्ररगंध पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते. या वर्षी या सोहळ्याचे १४ वे वर्ष होते. पुरुषोत्तम बेर्डे यांच्यासोबतच मृदगंध पुरस्कार विजेत्यांमध्ये सुरेखा पुणेकर (लोककला), श्रीगौरी सुरेश सावंत ( सामाजिक क्षेत्र), आदेश बांदेकर (अभिनय व सूत्रसंचालन), सुचित्रा बांदेकर (अभिनेत्री आणि निर्माती), रोहित राऊत (नवोन्मेष प्रतिभा-संगीत क्षेत्र), दीपाली देशपांडे (क्रीडा क्षेत्र) आणि ज्ञानेश महाराव (लेखक व पत्रकार ) यांना ‘मृद्रमगंध पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी बोलताना पुरस्कार विजेत्यांनी महाराष्ट्र शिरोमणी शाहीर विठ्ठल उमप यांच्या आठवणींना उजाळा देत पुरस्काराविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
 
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे अभिनेत्री रोहिणी हटट्गंडी म्हणाल्या जयराज साळगावकर (संपादक, कालनिर्णय), संदिप माळवी (अतिरिक्त आयुक्त, ठाणे) आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते ‘मृद‌करगंध पुरस्कार’ देण्यात आले. शाल, पुष्प पुस्तक, मानपत्र व विठ्ठल उमपांची प्रतिकृती असलेले मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी दत्ता भाटकर, गणेश धाडसे, अमृत कांबळे, पुंडलिक सानप, अनिल आरोसकार या रंगमंच कामगारांना अर्थसहाय्य देण्यात आले. तौफिक कुरेशी (झेंबे) वादक आणि गृप, पं. विजय चव्हाण व ग्रुप (महाराष्ट्राची वाद्य) यांच्या सुमधुर संगीताने आणि विशाल कृष्णा यांच्या कथ्थक नृत्याचा आस्वाद घेण्याची संधी रसिकांना या कार्यक्रमात मिळाली.
Powered By Sangraha 9.0