छत्रपती संभाजीनगर : पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरु असून लवकरच मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेला उत्तर मिळेल, अशी प्रतिक्रिया भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. राज्यभरात सध्या मुख्यमंत्री कोण होणार अशा चर्चा सुरु असताना फडणवीसांनी मंगळवारी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मुख्यमंत्री कोण होणार, या चर्चेचे लवकरच उत्तर मिळेल. तिन्ही पक्ष मिळून निर्णय घेतील. आमच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरु असून लवकरच याचे उत्तर मिळेल. आधी मुख्यमंत्री ठरल्यानंतर मंत्र्यांची नावेदेखील पुढे येतील," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - उद्धव ठाकरे मविआतून बाहेर पडणार? स्वबळावर लढण्याचा सूर
रडीचा डाव बंद करा!
विरोधकांकडून ईव्हीएमबाबत करण्यात येत असलेल्या आरोपांवर बोलताना ते म्हणाले की, "तुम्ही हरल्यावर ईव्हीएम वाईट म्हणण्याची पद्धत बंद करा. ईव्हीएमची पद्धत सुरुच राहणार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले. त्यामुळे आता हा रडीचा डाव बंद करायला हवा."