वसई तालुक्यातील रखडलेली कामे तत्काळ मार्गी लावा!

26 Nov 2024 14:58:09
Vasai

ठाणे : नालासोपारा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार राजन नाईक व वसईच्या ( Vasai ) आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी सोमवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी वसई-विरार महानगरपालिका आयुक्त अनिल पवार यांची भेट घेतली.

आगामी काळात वसई-विरारच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आयुक्तांशी चर्चा केली. जी रखडलेली कामे आहेत, ती तत्काळ मार्गी लावण्यात यावी आणि वसई-विरारच्या जनतेला योग्य सोयी-सुविधा उपलब्ध होतील, याची रुपरेषा तयार करावी, अशा सूचना दोन्ही आमदारांनी आयुक्तांना दिल्या.

तिन्ही विधानसभानिहाय बैठक घेऊन सर्व समस्यांचे निवारण करू, असे आयुक्त अनिल पवार यांनी यावेळी सांगितले. शिवसेना तालुका प्रमुख सुदेश चौधरी, भाजप महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

Powered By Sangraha 9.0