देशाला दिशा देणारा महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस उभा करू शकतात : दरेकर

26 Nov 2024 16:10:17
Darekar

मुंबई : “महाराष्ट्राचे सखोल ज्ञान असणारा, शरद पवार यांच्यानंतर महाराष्ट्राची नीट माहिती असणारा तरुण नेता कोण असेल, तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. सर्वार्थाने महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आशीर्वाद घेऊन, केंद्र सरकारचे पाठबळ घेऊन फडणवीस महाराष्ट्राला प्रगतीकडे नेऊ शकतात. या देशाला दिशा देणारा महाराष्ट्र ते उभा करू शकतात,” असा ठाम विश्वास भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी सोमवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी व्यक्त केला.दरेकर ( Darekar ) म्हणाले की, “राजकीय निर्णय तेथील संख्याबळावर, परिस्थितीवर होत असतात. ज्यावेळी एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्यावेळी भाजपचे संख्याबळ जास्त होते. परंतु, सरकारला बदलणे आवश्यक होते, त्यामुळे संख्याबळाचा विचार झाला नाही. राज्यात आज जनतेने बहुमत देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने दिले आहे. संपूर्ण महाराष्ट्र नरेंद्र मोदींच्या मागे उभा राहिला. अशा वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, माझीही इच्छा आहे, तशा प्रकारचे सुतोवाच आमच्या प्रदेशाध्यक्षांनी केले की, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. याचे कारण राज्याला एक अभ्यासू, कुशल अशा नेतृत्वाची गरज आहे,” असे दरेकर यांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0