संविधान सन्मान रॅलीमध्ये आमदार मंगल प्रभात लोढा यांचा सक्रीय सहभाग

26 Nov 2024 17:02:10
Rally

मुंबई : भारतीय संविधान दिनानिमित्त आयोजित 'संविधान सन्मान रॅली २०२४' मध्ये मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा ( Mangal Prabhat Lodha ) यांनी सक्रीय सहभाग घेतला. संविधानाच्या मूल्यांची जनजागृती करण्यासाठी डॉ. आंबेडकर मेडिकोस असोसिएशन आणि सामाजिक समरसता मंचाद्वारे आयोजित हा उपक्रम प्रशंसनीय असल्याचे त्यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. तसेच संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले!

संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्त, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकोस एसोसिएशन व सामाजिक समरसता मंच कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत गिरगाव चौपाटी ते राजभवन अशी प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभात फेरीच्या प्रारंभी डॉ. संगीता अंभोरे, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, श्री निलेश गद्रे व श्री नागेश धोडगे सामाजिक समरसता मंचाचे कार्यकर्ता यांनी सर्वांना संबोधित केले. संविधानाबाबत जागृती निर्माण व्हावी म्हणून विद्यार्थ्यांनी हातात फलक घेतले होते. या यात्रेमध्ये संविधान चिरायू होवो अशा घोषणा देण्यात आल्या.

प्रभात फेरी दरम्यान २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना गिरगाव येथील शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकावर मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. यात्रा राजभवनच्या प्रांगणात समाप्त झाली. मलबार हिलचे आमदार व कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या यात्रेत सहभाग घेतला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन व राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राज्याचे कौशल्य विकास मंत्री या नात्याने ४०० पेक्षा अधिक आयटीआयमध्ये संविधान मंदीर उभारण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला असून, ITI च्या विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी याचा लाभ होत आहे.

Powered By Sangraha 9.0