संविधान दिनानिमित्त संयुक्त अधिवेशन

26 Nov 2024 13:17:30
Joint Session

नवी दिल्ली : केंद्र सरकार मंगळवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी विशेष पद्धतीने संविधान दिन साजरा करणार आहे. संविधान दिनानिमित्त संसदेचे संयुक्त अधिवेशन ( Joint Session ) आयोजित करण्यात येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, “हा केवळ भारतीय संसदेचा उत्सव नाही. केंद्र सरकार भारतीय राज्यघटनेचा आदर करत असून त्याची मूल्ये देशातील जनतेसमोर आणत आहे. संविधान निर्मात्यांना आदरांजली अर्पण केली जाणार आहे. त्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांची विशेष संयुक्त बैठक बोलावण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या देशवासीयांना संबोधित करणार आहेत. त्याचप्रमाणे, घटनेच्या प्रस्तावनेचेही वाचन राष्ट्रपती मुर्मू करणार आहेत. या संयुक्त बैठकीममध्ये लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला स्वागताचे भाषण करतील.

Powered By Sangraha 9.0