नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकींमध्ये काँग्रेसला पराभव पतकारावा लागला. अशातच आता काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेतृत्व एक वेगळाच डाव टाकण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. प्रादेशिक पक्षांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकावा असा मनसुबा काँग्रेस आखत असल्याचा धक्कादायक दावा माजी राजदूत के.सी. सिंह यांनी केला आहे. आपल्या X हँडल वर ट्विट करत या बाबतीतला खुलासा केला आहे.
सीमी ग्रेवाल यांच्या विरोधी पक्षांवर केलेल्या टिकेवर उत्तर देताना के.सी. सिंह यांनी या बाबतची माहिती दिली आहे. के.सी. सिंह यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले की " काँग्रेसच्या वरिष्ठ वर्तुळात निवडणुकांवर बाहिष्कार टकण्या संदर्भात चर्चा सुरू झाली आहे. परंतु प्रादेशिक पक्ष याला सहजा सहजी तयार होतील अशी परिस्थीती अद्याप निर्माण झाली नाही. अशा पद्धीतीचा कावा रचत भारतामध्ये बांगलादेश सारखी परिस्थीती निर्माण करण्याचा त्यांचा विचार आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात काही माणसे सत्तेसाठी हपापलेली आहेत. त्यासाठी ही मंडळी कुठल्याही थराला जातील" असे सुतोवाच सिंह यांनी केले आहे. ईव्हीएम मशीनवर डूख धरत मतपत्रिकेच्या माध्यमातून काँग्रेसचे सरकार सत्तेवर येईल अशी त्यांना आशा वाटते.