प्रसूतिगृहातील एसएनसीयू कक्ष कमी वजनाच्या बालकांना आधार
26-Nov-2024
Total Views |
ठाणे : प्रसूतिनंतर कमी वजनाची बालके जन्मल्यावर त्यांची काळजी घेणे तारेवरची कसरत असते. मात्र, खासगी प्रसूतिगृहाप्रमाणेच सुसज्ज प्रसूतिगृह सिव्हिल रुग्णालयात ( Civil Hospital ) आहे. गेल्या ११ महिन्यांत एक किलोपेक्षा कमी वजनाची ३६ बालके प्रसूतिगृहात जन्मली आहेत. सिव्हिल रुग्णालयातील एसएनसीयू कक्ष कृश बालकांसाठी देवदूत ठरत असून, बर्याच बालकांची प्रकृती सुधारून माता आणि बाळ सुखरूप घरी जात आहेत.
ठाणे सिव्हिल रुग्णालयात चांगल्या उपचारांबरोबर अवघड शस्त्रक्रियाही यशस्वीरित्या केल्या जात आहेत. रुग्णालयातील प्रसूतिगृह तितक्याच क्षमतेने काम करताना दिसून येत आहे. ठाणे शहर, ग्रामीण, दुर्गम आदिवासी भाग आणि पालघर जिल्ह्यातील गर्भवती महिला प्रसूतिसाठी सिव्हिल रुग्णालयात येत असतात. काहीवेळा इमर्जन्सी असणार्या जोखमीच्या प्रसूतिसाठी गर्भवती महिला रुग्णालयात दाखल होत असतात.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूतिगृहात जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाची विशेष काळजी घेतली जात असल्याची माहिती वरिष्ठ बालरोगतज्ञ डॉ. सुरेश वानखेडे यांनी दिली. प्रसूतिगृहात अत्याधुनिक साधन असून, एखादे बाळ कमी वजनाचे जन्माला आलेच, तर त्याच्यासाठी एसएनसीयू (डशिलळरश्र छशुलेीप उरीश णपळीं) कक्ष या ठिकाणी सज्ज आहे. आई आणि बाळाला कोणताही त्रास होणार नाही, यादृष्टीने या कक्षात सर्व सोयी ठेवण्यात आल्या आहेत.