ईव्हीएम विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली!

26 Nov 2024 18:25:04
 
EVM
 
नवी दिल्ली : विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
 
हे वाचलंत का? -  पुन्हा कधीही मुंबई आणि देशात २६/११ सारखी घटना होऊ देणार नाही : देवेंद्र फडणवीस
 
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत महायूतीने बहुमत मिळवत अभूतपूर्व यश मिळवले. महाविकास आघाडीला मात्र, ४६ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे आता विरोधकांकडून ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, डॉ. के. ए. पॉल यांनी ईव्हीएमविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत याचिकाकर्त्याला फटकारले आहे. निवडणूकीत पराभव झाल्यावर तुम्हाला ईव्हीएम योग्य वाटते आणि हरल्यावर ईव्हीएममध्ये छेडछाड दिसते अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांवर ताशेरे ओढले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0