मुंबई : अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती, कोकण प्रांता तर्फे संविधान दिनानिमित्त ऑनलाइन कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७:३० ते ९:३० या वेळेत हे ऑनलाइन कवीसंमेलन होणार आहे. सर्व साहित्यिकांनी या कविसंमेलनाला उपस्थित राहावे असे आवाहन साहित्य भारती तर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आणि संमेलनात सहभागी होण्यासाठी प्रविण देशमुख (७५०६७४०६५२) यांच्याशी संपर्क साधावा.