भारतातील हैद्राबाद ठरले पहिले ग्रीन मेट्रो नेटवर्क

26 Nov 2024 12:08:55

hydrabad
नवी दिल्ली, दि.२५ : प्रतिनिधी 'एल अँड टी मेट्रो रेल हैदराबाद' हे प्रतिष्ठित आयजीबीसी ग्रीन प्लॅटिनम प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले मेट्रो रेल्वे नेटवर्क बनले आहे. रेड लाईन, ब्लू लाईन आणि ग्रीन लाईन हे तीन कॉरिडॉर' सर्व ५७ मेट्रो स्थानकांसह हा बहुमान मिळविणारे पहिले मेट्रो नेटवर्क ठरले आहे. शाश्वत शहरी वाहतूक आणि ग्रीन बिल्डिंग पद्धतींबद्दल या संस्थेचे समर्पण यायशातून दिसून येते.
इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (IGBC) द्वारे बेंगळुरू येथे आयोजित ग्रीन बिल्डिंग काँग्रेस २०२४दरम्यान हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.'एल अँड टी मेट्रो रेल हैदराबाद'चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ केव्हीबी रेड्डी आणि इतर प्रमुख अधिकाऱ्यांच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारण्यात आला. कृतज्ञता व्यक्त करताना रेड्डी म्हणाले, “आम्हाला हा प्रतिष्ठित सन्मान मिळाल्याबद्दल गौरव वाटतो. आमच्या टीमचे हैदराबाद शहरासाठी ग्रीन फ्युचर निर्माण करण्यासाठीच्या अथक प्रयत्नांचा पुरावा आहे. हे यश शहरासाठी पर्यावरणपूरक, कार्यक्षम आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक प्रदान करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळकटी देते.”

पुरस्काराचे निकष:
ऊर्जा कार्यक्षमता: ऊर्जेचा वापर ऑप्टिमाइझ करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणे.
इको-फ्रेंडली डिझाईन्स: सर्व मेट्रो स्थानकांवर पर्यावरणदृष्ट्या टिकाऊ वैशिष्ट्ये समाविष्ट करणे.
संसाधन संवर्धन: पाणी व्यवस्थापन, अक्षय ऊर्जा आणि कचरा कमी करणे याला प्राधान्य देणे.
Powered By Sangraha 9.0