ठाण्यात राज्यस्तरीय खुल्या द्विपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन

26 Nov 2024 14:18:59

rangbhumi
 
ठाणे : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, ठाणे शाखा आणि ‘पितांबरी’ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय खुली द्विपात्री अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे हे १३ वे वर्ष आहे. ही स्पर्धा रविवार १ डिसेंबर रोजी ‘अ. भा. मराठी नाट्य परिषद, तिसरा मजला, वारकरी भवन, गजानन महाराज मठासमोर, राम-मारुती रोड, ठाणे(पश्चिम)’ येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख २७ नोव्हेंबर आणि प्रवेश फी ३०० रुपये आहे. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या प्रथम विजेत्याला १० हजार रुपये, द्वितीय विजेत्याला ७ हजार रुपये, तृतीय विजेत्याला ५ हजार रुपये आणि दोन उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी हजार रुपये आणि प्रमाणपत्र अशी पारितोषिके मिळणार आहेत. स्पर्धेची अधिक माहिती, नियम आणि प्रवेश अर्ज ‘जयू साटम, पूजा झेरॉक्स, सिडको बस स्टॉप, कोळी समाज हॉलसमोर, ठाणा कॉलेज रोड, ठाणे (पश्चिम)’ येथे उपलब्ध आहे. अधिकाधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
 
Powered By Sangraha 9.0