मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांना मित्र पक्षांच्या ५ आमदारांचा पाठिंबा

26 Nov 2024 16:03:04
fadanvis

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून आता महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या ( Fadanvis ) नावाला मित्र पक्षांच्या ५ आमदारांनीही पाठिंबा दिला आहे. विधानसभा निवडणुकीत १३२ जागांवर विजय मिळवत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांपैकी कोण मुख्यमंत्री बनणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अशातच देवेंद्र फडणवीसांच्या नावाला मित्र पक्षांच्या ५ आमदारांनी पाठिंबा दिला आहे. या पाच आमदारांमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे, जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे, अशोकराव माने, युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा आणि अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांचा समावेश आहे.

Powered By Sangraha 9.0