लखनऊ : उत्तर प्रदेशच्या संभळ परिसरात, जामा मस्जिदीच्या सर्वेक्षणादरम्यान २४ नोव्हेंबर रोजी कट्टररपंथीयांकडून हिंसाचार करण्यात आला. आता पर्यंत या मध्ये २५०० जणांवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. लाखो रूपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं असून २० पेक्षा जास्त आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशातच आता अरफा खानम शेरवानी या महिला पत्रकाराने जाणीवपूर्वक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आपल्या सोशल मीडीया हँडलवरून हिंदू द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.
दगडफेक करणाऱ्या कट्टररपंथीयांचा गौरव करत उलट प्रशासानावरच टिकेचे ताशेरे ओढले आहेत. ही गोष्ट कमी की काय, सर्वोच्च न्यायालयावर सुद्धा शेलक्या शब्दात सदर महिेलेने टिका केली आहे. प्रत्येक मस्जिदीच्या खाली आता शिवलींग शोधली जाईल का असा अतर्क्य सवाल शेरवानी यांनी केला आहे. पोलिसांवर टिका करत त्यांनाच आरोपीच्या पिंजरात उभं करण्याचा प्रयत्न शेरवानी यांनी केला आहे. जमावाला काबूत ठेवण्यासाठी पोलिसांनी वारंवार शांतेतेचं आवाहन करून सुद्धा जमावाने प्रतिसाद दिला नाही. अशा परिस्थीतीच नाईलाजाने लाठीचार्ज आणि हवेत गोळीबार करावा लागला. या घटनेबद्दल चुकीची माहिती पसरवत धर्मांधतेला खतपाणी घालण्याचे काम शेरवानी करत आहेत. शेरवानी यांच्या मते मुस्लीमांनी आपली मस्जिद हिंदू समाजासाठी कुरबान केली. परंतु वास्ताविक प्रदिर्घ काळ न्यालयीन संघार्षनंतर मंदिर मस्जिदीचा वाद मिटला होता. शाहिद सिद्दीकी या स्थानिक आमदाराने गरळ ओकण्याचे काम सुरू केले आहे. आपल्या सोशल मीडीया हँडल वरून आक्षेपार्ह मजकूर पसरवण्याचे काम या माणसाने केले आहे.
माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार आता पर्यंत या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू झाला असून, परिस्थीती नियंत्रणात येईपर्यंत संभल मधील इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच बरोबर अनिश्चित काळासाठी तिथल्या शाळा बंद करण्याचा निर्णय स्थानीक प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.