मराठी चित्रपटांचा ‘इफ्फी’च्या फिल्म बाजारात सन्मान

चित्रपटांच्या प्रतिनिधींनी मानले महाराष्ट्र शासनाचे आभार

    25-Nov-2024
Total Views |
IFFI

पणजी : ५५व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजारात ( Iffi ) महाराष्ट्र चित्रपट, ‘रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळा’च्या माध्यमातून सहभागी झालेल्या ‘छबिला’, ‘तेरवं’, ‘विषयहार्ड’, ‘आत्मपॅमप्लेट’ या चित्रपटांच्या टीमचा सन्मान महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर यांच्या हस्ते पणजीमधील मांडवी नदीवरील क्रुझवर करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेत्री सुष्मा शिरोमणी, दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले, ‘ऑस्करज्युरी’ उज्ज्वल निरगुडकर, महामंडळाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे, ‘इम्पा’चे अभय सिंह, सिनेसमीक्षक डॉ. संतोष पाठारे, गणेश मतकरी, मनोज कदम उपस्थित होते. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच अशाप्रकारचा सन्मान चित्रपटाच्या टीमचा करण्यात आला. त्यामुळे टीमने आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त केले.

दर्जेदार मराठी चित्रपटांच्या

पाठीशी खंबीरपणे उभे

मराठी चित्रपटांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी दादासाहेब फाळके चित्रनगरी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असते. ‘इफ्फी’च्या फिल्म बाजारात सहभागी होणे, हे त्याचेच उदाहरण असून आगामी काळातदेखील असेच उपक्रम राबवण्यात येणार आहेत.