आळंदी : रिंगण प्रकाशन मुंबई आणि श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, ओतूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रिंगण वक्तृत्व स्पर्धा २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १५ डिसेंबर रोजी ‘शरदचंद्र पवार कला वाणिज्य महाविद्यालय, डुडूळगाव, आळंदी’ येथे होणार आहे. ‘बरे झाले देवा कुणबी केलो’, ‘सावधान! नकली संतांचं मार्केट आलं आहे’, ‘संतांचा धर्म: बढाना है तो जुडना होगा’, ‘स्त्री स्वातंत्र्य आणि वारकरी संप्रदाय’, ‘महाराज! हे वागणं बरं नव्हं’ आणि ‘धर्म जागो बसवेश्वरांचा’ हे या स्पर्धेचे विषय आहेत. संतविचारांवर आधारित पहिली आणि एकमेव राज्यस्तरीय खुली वकृतव स्पर्धा असलेल्या रिंगण या स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या प्रथम विजेत्याला ११ हजार रुपये, द्वितीय विजेत्याला ९ हजार रुपये, तृतीय विजेत्याला ७ हजार रुपये, चौथ्या विजेत्याला ५ हजार रुपये, पाचव्या विजेत्याला ३ हजार रूपये आणि उत्तेजनार्थ विजेत्याला २ हजार रुपये रोखरक्कम मिळणार आहे. सोबतच सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह मिळणार आहे.