६३ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला मुंबईत सुरुवात

25 Nov 2024 17:19:53
राज्य नाट्य स्पर्धा  
 
मुंबई : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६३ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला राज्यभर सुरुवात झालेली आहे. मुंबई केंद्राची प्राथमिक फेरी २४ नोव्हेंबर पासून गिरगावमधील साहित्य मंदिरात सुरुवात झालेली आहे. २४ नोंव्हेबर टे ५ डिसेंबर या कालावधीत ही फेरी पार पडणार आहे. या स्पर्धेतील नाटके पाहण्यासाठी तिकीट दर १५ ते २० रुपये आहेत. २४ नोव्हेंबर रोजी ‘फ्रीज महादेव’, २५ नोव्हेंबर रोजी ‘द इंटरव्ह्यु’ आणि ‘अशी गर्लफ्रेंड हवी’, २६ नोव्हेंबर रोजी पांढरपेशी वेश्या, २७ नोव्हेंबर रोजी ‘ती रात्र’, आणि ‘डियर किट्टी’, २८ नोव्हेंबर रोजी ‘पाकीट’, २९ नोव्हेंबर रोजी ‘वांझ’, ३० नोव्हेंबर रोजी ‘मुखवटे’ आणि ‘घात’, १ डिसेंबर रोजी ‘अशब्द’, २ डिसेंबर रोजी ‘मेला तो शेवटचा होता’ आणि ‘लिअर ने जगावं की मरावं’, ३ डिसेंबर रोजी ‘दोन ध्रुव आणि काचेचे गुलाब’ आणि ‘ना ते आपुले’, ४ डिसेंबर रोजी ‘झेंडा रोविला’ आणि ‘मुक्ता’ आणि ५ डिसेंबर रोजी ‘अरे अरे बाबा’ ही नाटके मुंबई केंद्रात सादर होणार आहेत.
 
Powered By Sangraha 9.0