कुमार आयलानी यांची विजयाची हॅट्ट्रिक

24 Nov 2024 15:21:26
Kumar Ailani

उल्हासनगर : उल्हासनगर १४१ विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार कुमार आयलानी ( Kumar Ailani ) यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार ओमी कलानी यांचा दणदणीत पराभूत करून ३० हजार, ७५४ मताधिक्याने विजय संपादन केला. मतमोजणी सुरू झाल्यापासून कुमार आयलानी आघाडीवर होते. त्यांना एकूण ८२ हजार, २३१ मते तर राष्ट्रवादी तुतारीचे उमेदवार ओमी कलानी यांना ५१ हजार, ४७७ मते मिळाली. मनसे ४ हजार, ९६९ वंचित ७ हजार, ४७३ तर नोटाला १ हजार, ७५९ मते मिळाली.

लाडकी बहीण, ज्येष्ठ नागरिक आणि शहरातील मतदारांनी मला भरभरून आशीर्वाद दिले. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे परिश्रम तसेच पोलीस व पत्रकारांचे सहकार्य मिळाले.

Powered By Sangraha 9.0