गणेश नाईक यांचा विक्रमी मताधिक्याने विजय

24 Nov 2024 18:36:10
Ganesh Naik

नवी मुंबई : १५० ऐरोली विधानसभा मतदारसंघातून भाजप महायुतीचे उमेदवार गणेश नाईक ( Ganesh Naik ) यांचा ९० हजार, ४११ अशा विक्रमी मताधिक्याने विजय झाला आहे. २०१९ सालच्या निवडणुकीमध्ये तब्बल ७८ हजारांचे मताधिक्य घेऊन नाईक जिंकले होते. २०२४ सालच्या निवडणुकीत त्यांनी स्वतःचाच मताधिक्याचा विक्रम मोडला आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघात गणेश नाईक हे पुन्हा आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ सालच्या निवडणुकीत ७८ हजारांची असणारी आघाडी मोडीत काढत ९० हजार, ४११ मतांनी आघाडी घेत विजय मिळविला आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर विधानसभेची पहिली निवडणूक पार पडली. शिवसेनेच्या शिंदे गटातील विजय नाहटा आणि विजय चौगुले यांनी तिकीट न मिळाल्याने अपक्षाची वाट धरली होती.

मंदा म्हात्रेंची हॅट्ट्रिक
नवी मुंबईचा गड राखण्यास भाजपला यश आले आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे गणेश नाईक, तर बेलापूर विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे या विजयी झाल्या आहेत. दरम्यान, म्हात्रे यांनी आमदारपदाची हॅट्ट्रिक केली आहे. मंदा म्हात्रे यांनी आमदार म्हणून विजय मिळवत हॅट्ट्रिक केली आहे.बेलापूर विधानसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी आघाडी घेतली होती.


Powered By Sangraha 9.0