सज्जनशक्तीचा विजय

24 Nov 2024 20:22:40
Sajag Raho

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल ( Result ) निश्चितच सर्वांना अचंबित करणारे ठरले आहेत. भाजपने तब्बल १३७ जागांवर विजय मिळवला आहे. लोकसभेत ज्यापद्धतीने विरोधकांनी ’फेक नॅरेटीव्ह’ तयार करत ’व्होट जिहाद’चा कट रचला, त्याला विधानसभा निवडणुकीत ब्रेक लावत महायुतीने दणदणीत विजय मिळवला. समाजामध्ये विरोधकाकडून तयार होणारे फेक नॅरेटीव्ह रोखण्यात संत समन्वय आणि सहयोगी संघटनांचा महत्वाचा वाटा होता. त्यामुळे हा एकाअर्थी समाजातील सज्जनशक्तीचा विजय म्हणणे वावगे ठरणार नाही.

भाजपने न भूतो... अशी कामगिरी केली, हे सत्य असले तरी अनेक संत महंत, पीठाधीश्वर, हिंदूहित हेच राष्ट्रहीत हे ओळखुन समाजात काम करणार्‍या प्रत्येक व्यक्तीचा हा विजय आहे. ’सजग रहो’ अभियानाच्या माध्यमातून राज्यभरात विविध ठिकाणी लोकांशी संवाद साधण्यात आला. हिंदुंना १०० टक्के मतदानासाठी जागृत करण्यात आले. सजग रहो अभियानामुळे फेक नॅरेटीव्हमागचा खरा मुद्दा उघडकीस आला. यात अनेकांचे डोळे उघडल्याचे निदर्शनासं आले. त्यामुळे संत समनवय आणि सहयोगी संघटना यांनी घेतलेली अपार मेहनत यामुळे मतदान २ ते ३ टक्के निश्चितच या सज्जनवृंदामुळे वाढ झाली, हे खरे.

Powered By Sangraha 9.0