वसई-विरार परिसरातील प्रस्थापित बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकुर आणि त्यांचे सुपुत्र क्षितिज ठाकुर यांचा दोन्ही जागांवर भाजपने पराभव ( Assembly result ) केला आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा माहीममधून पराभव झाला आहे.
मनसेचे राज्यातील एकमेव आमदार राजू पाटील यांचा शिवसेनेच्या राजेश मोरे यांनी कल्याण ग्रामीणमधून पराभव केला आहे.
राज्यात कायम किंगमेकर समजल्या जाणार्या बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना भोपळाही फोडता आलेला नाही.
राज ठाकरे यांनी ठाण्यात दोन सभा घेऊनही त्यांना यश मिळाले नाही. अविनाश जाधव यांचा मोठा पराभव झाला आहे.
संगमनेर विधानसभा मतदारसंघातून आठवेळा निवडून आलेले काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात पराभूत झाले आहेत.
रत्नागिरी उदय सामंत आणि राजापूर विधानसभा मतदारसंघांमधून किरण सामंत असे दोघे बंधू शिवसेेनेच्या तिकिटावर निवडून आले आहेत.
वांद्रे पूर्वमधून भाजपचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार हे विजयी झाले, तर त्यांंचे बंधू विनोद शेलार हे मालाड पश्चिममधून पराभूत झाले आहेत.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख हे लातुर शहरमधून विजयी झाले असले, तरी त्यांचे बंधू धीरज देशमुख लातुर ग्रामीणमधून पराभूत झाले आहेत. २०१९ मध्ये दोघेही काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते.
कुडाळमधून शिवसेनेच्या तिकिटावर नीलेश, तर भाजपच्या तिकिटावर नितेश राणे हे बंधू निवडून आले आहेत.
माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचाही पराभव झाला आहे. भाजपचे अतुल भोसले यांनी त्यांना पराभूत केले.
नाशिकच्या नांदगावमधून निवडणूक लढविणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांचा शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी पराभव केला आहे.
२०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरमधून खासदार झालेल्या इम्तियाज जलिल यांचा २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीतही पराभव झाला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही जनतेने त्यांना नाकारले आहे. भाजप नेते अतुल सावे यांनी त्यांचा पराभव केला आहे.
बारामतीमधील काका विरुद्ध पुतण्या लढाईत काकांचा विजय झालेला आहे. अजित पवार यांचा विजय झालेला आहे. तर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युगेंद्र पवार यांचा पराभव झाला आहे.
कागल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचा विजय झालेला आहे. तर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार समरजित घाटगे यांचा पराभव झालेला आहे.
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांचा पराभव झाला आहे.
डॉ. बाबासाहेब देशमुख हे विजयी झाले असून ते सांगोल्यातून तब्बल ११ वेळा विधानसभेवर निवडून गेलेले शेकापचे दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत. त्यांनी शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांनी पराभव केला आहे. २०१९ मध्ये झालेल्या अनिकेत देशमुख यांच्या पराभवाचा त्यांनी वचपा काढला आहे.
मुंबईच्या वरळीमधून उबाठाचे आदित्य ठाकरे विजयी झाले असून त्यांनी माजी खा. मिलिंद देवरा आणि मनसेचे संदीप देशपांडे यांचा पराभव केला आहे.
बीड विधानसभा मतदारसंघाकडेदेखील सर्वांचे लक्ष लागले होते. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी त्यांचे चुलत बंधू डॉ. योगेश क्षीरसागर यांचा पराभव केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर पाटील विजयी झाले असून त्यांनी त्यांच्याच भगिनी तथा महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांचा पराभव केला आहे.
भाजप नेते तथा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा मुलगा आणि विद्यमान आमदार संतोष दानवे हे भोकरदन विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. तर, त्यांच्या भगिनी कन्नड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर मैदानात होत्या. त्यांनी त्यांचे पती हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला आहे.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा उबाठाचे अजय चौधरी यांनी त्यांचा पराभव केला आहे. नांदगावकर यांच्यासाठी राज ठाकरे यांनी सभादेखील घेतली होती.
विधानसभेच्या निवडणुकीत एकही आमदार निवडून न आल्यामुळे मनसेचे ‘इंजिन’ रुळावरून घसरल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे.
काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनाही या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. भाजपच्या राजेश वानखेडे यांनी त्यांचा पराभव केला आहे. यशोमती ठाकूर या सलग तीनवेळा तिवसा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या.
भाजपच्या कालिदास कोळंबकर यांनी नवव्यादा विजयी गुलाल उधळला. कोळंबकर यांनी २४ हजार, ९७३ मतांनी विजय मिळवला असून उबाठाच्या श्रद्धा जाधव यांचा पराभव केला. श्रद्धा जाधव यांना ४१ हजार, ८२७ मते मिळाली.
गडचिरोलातील अहेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे धर्मराव बाबा आत्राम विजयी झाले आहेत. त्यांनी अपक्ष अंबरिश राजे अत्राम यांचा पराभव केला. त्यामुळे धर्मराव बाबा आत्राम यांची कन्या पवार गटाच्या भाग्यश्री आत्राम या तिसर्या क्रमांकावर फेकल्या गेल्या.
तासगाव-कवठे-महांकाळ विधानसभा मतदारसंघात सांगलीचे माजी खासदार संजयकाका पाटील यांचा पराभव झाला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर माजी खासदार संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात प्रवेश केला होता. तसेच लोकसभेची निवडणूक त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून लढवली होती. मात्र, त्यातही त्यांचा पराभव झाला होता. या मतदारसंघात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे रोहित पाटील यांचा विजय झाला आहे.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांचा कोरेगाव मतदारसंघातून पराभव झाला आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे महेश शिंदे हे विजयी झाले आहेत. शशिकांत शिंदे यांनी सातारा लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीतही शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला होता.