रामजानकी मंदिराच्या १०० कोटींच्या जागेवर कब्जा , मध्य प्रदेशात भाजपचा बुलडोझर पॅटर्न

    24-Nov-2024
Total Views |

Illegal Construction
 
ग्वालियर : मध्यप्रदेशातील ग्वालियर येथील तासगंज येथील कोटा येथे असलेल्या रामजानकी मंदिराच्या सुमारे ९ विविध जागांवर अतिक्रमण केल्याचा आरोप आहे. आता हे अतिक्रमण हटवण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त कारवाईत या जमिनीवर १०० कोटी खर्चाएवढी बांधलेली भिंत आणि इतर बेकायदा बांधकामे शनिवारी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी बुलडोजझरच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली.
 
संबंधित भूखंड हा हडप करत ती विकण्याचा कट रचण्याl आल्याचा आरोप आहे. माध्यमानुसार, जिल्हाधिकारी रुचिका चौहान यांच्या निर्देशनानुसार, जमिनीवर एक तटबंदी भली मोठी भिंत बांधण्यात आली होती. यावर तासगंज येथील एका व्यक्तीने याप्रकरणाविरोधात कारवाई केली होती असून त्यांचे नाव नरेंद्र बाबू असून त्यांच्या कारवाईमुळे संबंधित जमीन अतिक्रमणातून मुक्त झाली आहे. तर यामुळे अनेक फसवणुकीच्या घटना घडल्या जात होत्या मात्र आता अशा घटना घडणार नाही.
 
याप्रकरणात महसूल निरीक्षक प्रदीप महाकाली आणि पटवारी इकबाल खान यांच्या अहवालानुसार नायब तहसीलदार डॉ. रमाशंकर सिंह यांनी मध्य प्रदेशातील संबंधित जमिनीबाबत संहिता कलम २४८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत तहसीलदार शिवदत्त कटारे, महापालिकेचा अधिकारी आणि स्थानिक पोलिसांचाही यामध्ये सहभाग होता अशी माहिती समोर आली आहे.