मलिक बापलेकीची जोडी पिछाडीवर!

23 Nov 2024 09:57:15

malik
 
मुंबई : (Sana Malik and Nawab Malik) २० नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या बहुचर्चित विधानसभा निवडणुकीचा महानिकाल आज जाहीर होणार आहे. महाराष्ट्राचा महाकौल कोणाला मिळणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. तसेच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
 
आतापर्यंत हाती मिळालेल्या कलानुसार अणुशक्तीनगर मधून सना मलिक १७१० मतांनी पिछाडीवर आहे. तेथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे फहाद अहमद यांना ६०५५ मतं मिळाल्याची माहिती आहे. तर सना मलिक यांना ४३४५ मतं मिळाली आहेत.
 
दुसरीकडे मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघात नवाब मलिकांना मोठा धक्का बसला आहे. ईव्हीएम मतमोजणीच्या पहिल्या फेरीत अबू आझमी यांना ३८८४ , अतिक खान (MIM) यांना ३६१७ मते मिळाली आहेत. तर नवाब मलिक यांना फक्त ४६१ मते मिळाल्याने ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0