मुंबई : महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीचा पहिला निकाल समोर आला आहे. महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी पालघर मतदारसंघातून महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित ( Rajendra Gavit ) यांचा ४० हजार मतांनी विजय झाला आहे.
शिवसेना उबाठा गटाचे जयेंद्र दुबळा यांचा पराभव करुन राजेंद्र गावित यांनी दमदार विजय मिळवला आहे. तसेच येथे नरेश कोरडा हे मनसेचे उमेदवार उभे होते त्यामुळे येथे आपल्याला तिरंगी लढत पाहायला मिळाली.
राजेंद्र गावित यांनी महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये ४० हजार इतक्या मताधिक्याने निवडून येऊन आपला ठसा उमटवलेला आहे.