मुंबई : नालासोपारा मतदार संघातील बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर यांचा पराभव झाला असून भारतीय जनता पक्षाचे राजन नाईक यांचा दणदणीत विजय झाला आहे. निवडणुकीच्या काही दिवसांआधी घडलेल्या नाट्यपूर्ण घटनांमुळे विजय कुणाचा होईल यावर साशंकता निर्माण झाली होती. परंतु भाजपने यशस्वी रित्या विजय खेचून आणला आहे. तब्बल ३० हजार मतांच्या आघाडीने राजन नाईक यांनी क्षितीज ठाकूर यांचा पराभव केला आहे.
माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार नालासोपारा मधील जनता नव्या चेहऱ्याच्या शोधात होती. पाण्याचा प्रश्न, स्वचछतेचा प्रश्न निर्माण झाला होता. यामध्येच राजन नाईक यांच्या नेतृत्वामध्ये परिवर्तनाची नवी पहाट जनतेला अनुभवायला मिळेल अशी आशा लोकांमध्ये जागृत झाली. विकासाचा नवा आराखडा घेऊन लोकांसमोर येणारे राजन नाईक हे जनतेच्या पसंतीस पडले हे आता स्पष्ट झाले आहे.