मुंबई : (Pravin Darekar) महाराष्ट्रात थोड्याच वेळात बहुचर्चित विधानसभा निवडणुकीच्या महानिकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. तसेच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये निकालापूर्वीपासूनच मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी चर्चा सुरु होती. अशातच देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होतील, असे विधान भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केले आहे.
भाजपच्या नेतृत्वामध्ये महायुतीने आतापर्यंत जवळपास २२० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडी ४८ जागांवर पुढे आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाचे प्रविण दरेकरांनी कौतुक करत सर्वाधिक जागा भाजपच्या असल्याने मुख्यमंत्री भाजपचाच होणार, असे दरेकर पुढे म्हणाले.
तसेच नुकत्याच हाती आलेल्या कलानुसार नागपूर दक्षिण मतदारसंघात देवेंद्र फडणवीस ४,७१३ मतांनी आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे हे पिछाडीवर आहेत.