मुंबई : भारतीय जनता पक्षाचे मलाबर हिल मतदार संघाचे नेते मंगल प्रभात लोढा विजयी झाले आहेत. तब्बल ३१ हजार मतांची आघाडी घेऊन लोढा यांनी विजयश्री खेचून आणला आहे. उबाठा गटाचे भेरूलाल चौधरी यांचा पराभव झाला असून भाजपने दमदार कामगिरी केल्याचे समोर आले आहे.
गेली ३० वर्ष मंगल प्रभात लोढा सातत्याने विजयी होत आहेत. त्यांनी आपली विजयी परंपरा कायम ठेवल्याचे दिसून येत आहे. मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आणि राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून देखील मागील २ वर्षांच्या काळात काम केले आहे.