मुंबई : (Devendra Fadnavis) महायुतीच्या विजयाची निश्चिती आता जवळपास निश्चित झाली आहे. महायुतीला २२१ तर मविआला ५७ जागा मिळाल्या आहेत. देवेंद्र फडणवीसांचं एक ट्विट सध्या व्हायरल होताना दिसत आहे. एक है तो सेफ है! मोदी है तो मुमकीन है! देवेंद्र फडणवीसांचे सूचक ट्विट केले आहे. देवेंद्र फडणवीस १९ हजार ४३७ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्या मातोश्री सरीता फडणवीस यांनीही त्यांचे अभिनंदन केले. तसेच गृहमंत्री अमित शाह यांनीही देवेंद्र फडणवीसांचे फोन करत अभिनंदन केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील राजकारणाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. भाजपाला सलग तीन वेळा बहुमत मिळवून दिले. २०१४, २०१९ आणि २०२४ सलग तीनवेळा भाजपला शंभरीपार नेले. असा पराक्रम करणारे ते महाराष्ट्रातील एकमेव नेते ठरले आहेत. देवेंद्र फडणवीस यांची एक समर्पित कार्यकर्ता, अशी ओळख आहे. २०१४ साली ते मुख्यमंत्री होते, पण, २०१९ला उद्धव ठाकरेंनी कपटाने मुख्यमंत्रीपद हिसकावून घेतले. त्यांनी पक्षाला पुन्हा उभारी दिली. स्वत:तला एक आक्रमक विरोधी पक्षनेता महाराष्ट्राला दाखविला. पुन्हा समिकरणे जुळवून आणली. सरकार आणले. हे करताना केवळ पक्षाच्या आदेशावर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. पण, सरकारचे संपूर्ण दायित्त्व घेतले.
लोकसभेतील दारुण पराभवानंतर महाराष्ट्रातील भाजपच नव्हे तर महायुतीचाही कार्यकर्ता खचला होता. त्यावेळी केंद्रीय नेतृत्त्वाने जागावाटप ते प्रचारयंत्रणा संपूर्ण अधिकार फडणवीसांना बहाल केले आणि या संधीचे त्यांनी आज सोने करुन दाखविले. निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी आणि त्यांच्या संपूर्ण इकोसिस्टीमने एकट्या देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले होते, पण, महाराष्ट्र कुणासोबत होता, हे आजच्या निकालांनी दाखवून दिले. संयमी आणि कणखर नेतृत्त्व: शरद पवार, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांनी अत्यंत नीच पातळीवर जाऊन व्यक्तिगत टीका केली. पण, त्यांना कायमच संयमाने त्यांनी उत्तर दिले आणि कधीही तोल ढळू दिला नाही. ही टीका अगदी कुटुंबापर्यंत गेली होती.
तरुणाईमध्ये असलेली इन्फ्रामॅन म्हणून असलेली ओळख आणि त्यातून महाराष्ट्राला कशात अधिक रुची आहे, हे या निकालांनी दाखवून दिले. विकासाची धोरणे आणि धाडसी निर्णय : महाराष्ट्रात कधी नव्हे झाली ती विकास कामे २०१४ ते २०१९ या कालखंडात झाली. त्यालाच पूर्णत्त्व प्राप्त होताना महाराष्ट्राने २०२२ ते २०२४ या कालखंडात पाहिले. विरोधक गुजरात, कर्नाटकचे गोडवे गात असताना देवेंद्र फडणवीस यांनी मात्र महाराष्ट्रात सर्वाधिक ५२ टक्के गुंतवणूक आणत त्याला सडेतोड उत्तर दिले.
कायम विकासाचा चेहरा असलेला देवेंद्र फडणवीस यांचा आक्रमक हिंदूत्त्ववादी चेहराही या विधानसभा निवडणुकीने अनुभवला. पण, काश्मिरात तिरंगा फडकावणारा, राममंदिरासाठी तिन्ही कारसेवांमध्ये उपस्थित असणारा मुळातच हा आक्रमक हिंदूत्त्ववादी चेहराच होता. गेल्या दोन निवडणुकांमध्ये वोट जिहाद आक्रमकपणे पुढे आल्यानंतर त्यांच्यातील हिंदूत्त्व त्यांना स्वस्थ बसू देणारे नव्हतेच.