कालिदास कोळंबकरांची विजयाची परंपरा कायम; वडाळ्यातून सलग नवव्यांदा विजयी

23 Nov 2024 11:45:16
 
KOLAMBKAR
 
मुंबई : (Kalidas Kolambakar) मुंबईतील वडाळा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यांनी विजयाची परंपरा कायम राखत सलग नवव्यांदा आमदार म्हणून निवडून येण्याचा बहुमान मिळवला आहे.
 
यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी वडाळा मतदारसंघातून भाजपकडून कालिदास कोळंबकर, उद्धव ठाकरे गटाकडून श्रद्धा जाधव आणि मनसेकडून स्नेहल जाधव निवडणुकीच्या रिंगणात होते.
 
२००९ पासून आमदार असलेल्या कोळंबकरांचे सलग नवव्यांदा विजयी होत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवले जाणार असल्याने विजयाचा आनंद द्विगुणित झाला आहे.
 
Powered By Sangraha 9.0