मुंबई : (Ajit Pawar) महाराष्ट्राचा महाकौल कोणाला मिळणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. २० नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या बहुचर्चित विधानसभा निवडणुकीचा महानिकाल आज जाहीर होणार आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील अनेक नेत्यांचं राजकीय भवितव्य पणाला लागलं होते. यापैकी काही लढती अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात होत्या आणि त्याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले होते. यातीलच एक म्हणजे बारामती मतदारसंघातील अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार या काका-पुतण्यामधील लढत आहे.
तर याच बारामती मतदारसंघामध्ये पोस्ट मतमोजणीमध्ये युगेंद्र पवारांनी बाजी मारली होती, पण ईव्हीएम मतमोजणीनंतर अजित पवार हे आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. तर, युगेंद्र पवार पिछाडीवर आहेत. पुढच्या काही तासांतच बारामतीचा निकालाचे चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे आता बारामतीचा गड कोण राखणार याची उत्सुकता शिगेला आहे.