मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. आदित्य ठाकरेंनी ( Aditya Thacheray ) मात्र, आपला वरळी हा मतदार संघ अवघ्या आठ हजार मतांनी राखला आहे. निवडणूकीच्या विजयानंतर त्यांनी निकालासंदर्भात प्रतिक्रीया दिली. "आजच्या निकालाने आमचा अपेक्षाभंग झाला. आता यात ईव्हीएमने किती प्रचार केला, ते पहावं लागणार आहे," असे म्हणत त्यांनी निकालाचे खापर ईव्हीएमवर फोडले.
आम्हाला अपेक्षित असा निकाल लागला नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. "महाराष्ट्राने मतदान केलंय की, ईव्हीएमने केलंय?", असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी निवडणूक आयोगाच्या व्यवस्थापनावरच शंका घेतली.
"अपेक्षित असा निकाल लागला नसला तरी तो मान्य करुन पुढे चाललो. प्रचार नक्की कोणी किती केला? ईव्हीएमने किती केला हे पाहिले पाहिजे" असेही ते म्हणाले. "मविआमधील दिग्गज नेते पराभूत झाले जे सोबत उभे राहतील असं वाटत होतं, त्यामुळे यावर चर्चा केली पाहिजे" असेही आदित्य ठाकरे म्हणाले.