मुख्यमंत्रीपदावर दावा सांगणाऱ्या बच्चू कडूंचा बालेकिल्ल्यात दारुण पराभव!

23 Nov 2024 14:11:03

ACHALPUR
 
 अमरावती : (Achalpur Assembly Constituency Result) अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघ हा बच्चू कडू यांचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र बच्चू कडूंना स्वतःचाच गड राखण्यात अपयश आले आहे. अचलपूर मतदारसंघातून बच्चू कडू यांचा पराभव झाला असून भाजपचे प्रविण तायडे हे विजयी झाले आहेत.
 
बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीराजे आणि राजू शेट्टी यांच्याशी मिळून परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीची स्थापन केली होती. या आघाडीने अचलपूर मतदारसंघातून प्रहार जनशक्ती पक्षाच्या बच्चू कडू यांना उमेदवारी दिली होती. तसेच बच्चू कडू यांच्या विरोधात काँग्रेसचे अनिरूद्ध देशमुख आणि भाजपचे प्रवीण तायडे अशी तिरंगी लढत झाली.
 
बच्चू कडू यांना या पराभवाचा जबर धक्का बसला असून या निकालामुळे त्यांचे तिसऱ्या आघाडीच्या सरकार स्थापनेचे स्वप्न भंगले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0