ठाणे जिल्ह्यात ‘मोठा भाऊ’ असलेल्या भारतीय जनता पक्षाने एकूण 18 पैकी नऊ जागा जिंकून ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा ‘भाजपच मोठा भाऊ’ असल्याचे सिद्ध केले. 2019 सालच्या तुलनेत भाजपने एक अतिरिक्त जागा जिंकली, तर जिल्ह्यात उबाठा, मनसे सोबतच काँग्रेसचाही सुपडा साफ झाला आहे.
ठाणे जिल्ह्यात ‘मोठा भाऊ’ असलेल्या भारतीय जनता पक्षाने एकूण 18 पैकी नऊ जागा जिंकून ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा ‘भाजपच मोठा भाऊ’ असल्याचे सिद्ध केले. 2019 सालच्या तुलनेत भाजपने एक अतिरिक्त जागा जिंकली, तर जिल्ह्यात उबाठा, मनसे सोबतच काँग्रेसचाही सुपडा साफ झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवाडा, मिरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, कल्याण ग्रामीण, कळवा-मुंब्रा, डोंबिवली, कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण पश्चिम, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, भिवंडी ग्रामीण, शहापूर आणि मुरबाड या 18 विधानसभेच्या जागा असून एकूण 244 उमेदवार रिंगणात होते. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला सहा, तर भाजपने आठ जागांवर विजय मिळवला होता. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडे प्रत्येकी एक, तर भिवंडी पूर्वमध्ये काँग्रेसने आणि मिरा-भाईंदरमध्ये अपक्ष महिला निवडून आली होती. त्यावेळी भाजप हा ‘मोठा भाऊ’ ठरला होता आणि 2024 सालच्या निवडणुकीतही भाजपने 18 पैकी नऊ जागा जिंकून पुन्हा एकदा जिल्ह्यात आपणच ‘मोठा भाऊ’ असल्याचे सिद्ध केले आहे.
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुतीच्या जागावाटपात उत्तम समन्वय होता. मात्र, मविआतील घटक पक्षांचे एकमेकांशी सूर जुळले नव्हते. काँग्रेसच्या रुसव्याफुगव्यांनंतर समाजवादी पक्षाला सोबत घेत मविआचे गणित जुळले. दुसरीकडे महायुतीतर्फे भाजप नऊ जागांवर, शिवसेना सात, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) दोन जागांवर लढले, तर मविआतील उबाठा गट नऊ, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सहा, काँग्रेस दोन आणि समाजवादी दोन (भिवंडी पश्चिममध्ये काँग्रेस विरुद्ध मैत्रीपूर्ण लढत) अशी लढत झाली. भाजपच्या बंडखोरांनी तलवारी म्यान केल्या. मात्र, शिवसेना शिंदे गटाने बंडखोरी करून महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकला होता. तरीही भाजपने हे आव्हान पेलत्याचे दिसते.
वास्तविक सागरी, नागरी आणि डोंगरी अशी ओळख असलेल्या ठाणे जिल्ह्यात भाजपकडे सर्वाधिक आठ जागा होत्या. तरीही या भागातील राजकारणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वरचष्मा असल्याने सत्तेत असूनही भाजपला आपला खुंटा मजबुत करता आला नव्हता. परिणामी, भाजपच्या नेतृत्ववाढीला ठाण्यामध्ये मोठी खिळ बसली होती. डोंबिवलीतील रविंद्र चव्हाण यांचे मंत्रिपद वगळता भाजपला राज्याच्या सत्तेमध्ये फारसे स्थान मिळाले नव्हते. तरीही कुठलीही कटुता न आणता या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप महायुतीने प्रचारात व्यापक व्यूहरचना केली. तसेच विधानसभेचे बिगूल वाजण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा ठाण्यात झाली होती. या सभेला हजारो लाडक्या बहिणींनी हजेरी लावली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांची प्रत्येकी एक सभा झाली. याशिवाय हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्र्यांची फौज ठाण्यात उतरली होती. त्याचा लाभ महायुतीला झालाच, पण भाजपलाही झाल्याचे दिसून येते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघामध्ये उबाठाच्या केदार दिघे यांचा तर ओवळा-माजिवड्यात सेनेच्या प्रताप सरनाईक यांनी उबाठाच्या नरेश मणेरा यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. ठाणे मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार संजय केळकर यांनी उबाठाच्या राजन विचारे यांना मात दिली. याठिकाणी मनसेच्या अविनाश जाधव यांची डाळ शिजलीच नाही. मनसेने पाच जागा, काँग्रेसने दोन जागा आणि उबाठा शिवसेनेने नऊ जागा लढवूनदेखील त्यांना जिल्ह्यात एकही जागा जिंकता आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सहा जागा लढवून जितेंद्र आव्हाड यांच्या रूपाने केवळ मुंब्रा-कळवा ही एकच जागा राखली, तर समाजवादी पक्षाने दोन जागा लढवून भिवंडी पूर्वच्या रूपात एका जागी विजय मिळाला आहे.
मिरा-भाईंदरमध्ये भाजपच्या नरेंद्र मेहता यांनी काँग्रेसच्या मुझफ्फर हुसेन यांना हरवले. अपक्ष गीता जैन येथे तिसर्या स्थानी फेकली गेली. नवी मुंबईतही शिवसेनेच्या बंडखोरांचे आव्हान परतवत ऐरोली आणि बेलापूरमध्ये भाजपने विजय संपादन केला. भिवंडीत काँग्रेसच्या बंडखोरीमुळे आणि ‘एमआयएम’ व सपाच्या उमेदवारामुळे भाजप महायुतीचा मार्ग मोकळा झाला असला, तरी भाजपमधून शिंदे गटाच्या तिकिटावर लढलेल्या संतोष शेट्टी यांना भिवंडी पूर्व मतदारसंघामध्ये सपाचे रईस शेख यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. भिवंडी ग्रामीणमध्ये शिवसेनेचे आ. शांताराम मोरे यांच्या विरोधात उबाठाच्या महादेव घटाळ यांची मात्रा चालली नाही. कल्याण ग्रामीणमध्ये विश्वनाथ भोईर यांनी उबाठा गटाचे सचिन बासरे यांचा पराभव केला. मुरबाडमध्ये भाजपच्या किसन कथोरे यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये गेलेल्या सुभाष पवार यांचा पराभव केला. शहापूरमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आ. दौलत दरोडा यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाच्या पांडुरंग बरोरा यांना आसमान दाखवले.कल्याण पूर्व मतदारसंघातील भाजप विद्यमान आ. गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी कारागृहात असतानाही त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी येथे भाजपचे कमळ फुलवले. येथे त्या गोळीबारात जखमी महेश गायकवाड यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली होती. डोंबिवली हा भाजपच्या रविंद्र चव्हाण यांचा बालेकिल्ला असूनही येथे शिवसेनेतून उबाठामध्ये गेलेल्या दिपेश म्हात्रे यांनी त्यांना अपशकून करण्याचा फोल प्रयत्न केला. कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे आ. राजू पाटील यांचे शिवसेनेच्या नवख्या राजेश मोरे यांनी पुरते पानिपत केले. उल्हासनगरमध्ये भाजपच्या कुमार आयलानी यांनी शरद पवार गटाचे ओमी पप्पू कलानी यांना चारीमुंड्या चीत केले, तर अंबरनाथमध्ये सेनेच्या बालाजी किणीकर यांनी उबाठाच्या राजेश वानखेडे यांना पराजित केले.
पक्ष जिंकलेल्या जागा
भाजप ०९
शिवसेना (शिंदे) ०६
काँग्रेस ०१
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ०१