पनवेल विधानसभा मतदारसंघात प्रशांत ठाकूर यांची आघाडी! लीना गरड यांची मशाल विझली

23 Nov 2024 14:11:28
  
Panvel Vidhansabha Election 2024
 
पनवेल : राज्याच्या विधानसभा निवडणूक २०२४ चा निकाल २३ नोव्हेंबर रोजी सुरू आहे. राज्यातील १८८ विधानसभा जागांवर महायुती, महाविकास आघाडी, तिसऱी आघाडी आणि अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. अशातच पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदार आणि उमदेवार म्हणून प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांचा संधी देण्यात आली. अशातच प्रशांत ठाकूर यांची विक्रमी आघाडी आहे.
 
मात्र यावेळी महाविकास आघाडीने पनवेल विधानसभा मतदारसंघातून एका बाजूला बाळाराम पाटील यांना शिट्टी चिन्हावरून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यास सांगितला. तर दुसरीकडे उबाठा गटाकडून लीना गरड यांना उमेदवारी देण्यात आली होती. प्रशांत ठाकूर आणि भाजपचा बालेकिल्ला पाडण्यासाठी महाविकास आघाडीने मतांचे विभाजन करण्यासाठी आपले दोन उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात उभे केले होते.
 
मात्र. आता प्रशांत ठाकूर यांचा १५ व्या फेरीत २७ हजार ०७६ मतांचे लीड घेतले आहे. तर शेकापचे अपक्ष म्हणून विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहिलेले उमेदवार बाळाराम पाटील यांनी शिट्टी चिन्हावरून १५ व्या फेरीत ७७ हजार ५३७ मते आहेत. तर दुसऱ्या बाजूला पनवेल विधानसभा मतदारसंघात लीना गरड या एक्स फॅक्टर ठरतील असेही सांगण्यात येत आहे. लीना गरड यांना १५ व्या फेरीत ३१ हजार ४०० मते मिळाली असून येणाऱ्या २६ व्या फेरीपर्यंत मतमोजणी सुरू राहणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0