सिंधुदुर्ग : कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या नितेश राणेंनी हॅट्रिक केली आहे. त्यांच्या विरोधात उबाठा गटाचे संदेश पारकर मैदानात होते. दरम्यान, नितेश राणेंनी ५९ हजार ५८८ मते घेत कणकवलीमध्ये सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे.
शनिवारी सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली असून महायूती आघाडीवर आहे. आतापर्यंत आलेल्या कलानुसार, महायूतीने २२१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडी केवळ ५० जागांनी पिछाडीवर आहे. कणकवली विधानसभेत नितेश राणेंनी आघाडी घेत भाजपचा गड कायम राखला आहे. दरम्यान, यावेळी राज्यात पुन्हा एकदा महायूतीचे सरकार बनण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.