कुडाळ मतदारसंघात निलेश राणे पर्व! तळकोकणातून उबाठा हद्दपार

23 Nov 2024 15:02:13
 
Nilesh Rane
 
कुडाळ : विधानसभा निवडणूक २०२४ चा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला. कुडाळ मतदारसंघात शिवसेनेकडून निलेश राणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर शिवसेना उबाठा गटाकडून वैभव नाईक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. कुडाळ मतदारसंघात मतमोजणी करत असताना एकूण निलेश राणे यांनी आपली आघाडी टिकवून ठेवत विजयी मिळवला आहे. त्यांनी ८१६५९ (+८१७६) मतांनी विजयी मिळवला आहे.
 
तर दुसरीकडे उबाठा गटाकडून वैभव नाईक यांना ७३४८३ मतांवर समाधान मानावे लागले आहे. कुडाळ मतदारसंघात राणे यांनी उबाठा गटावर दमदार विजय मिळवला असून उबाठा गटाला हद्दपार केले आहे. त्यामुळे आता कुडाळ मतदारसंघात निलेश राणे यांचे नवे पर्व सुरू झाले आहे.
 
Powered By Sangraha 9.0