महायुती दोनशे पार! मविआचा सुपडा साफ!

23 Nov 2024 10:43:45

Mahayuti
 
 
मुंबई  (Maharashtra election result 2024) : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला असून महायुतीने आपल्या विजयाची विक्रमी घोडदौड सुरू ठेवलली आहे. महाराष्ट्रातील जनतेने महायुतीने २२० जागांवर आघाडी घेतली आहे. मविआ फक्त केवळ ६० जागांवर आकसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. यात भाजपला १२० पेक्षा जास्त तर एकनाथ शिंदेंना ५८ तर अजितदादांच्या ४२ जागा निवडून आल्या आहेत. काँग्रेसला केळ २१ तर उद्धव ठाकरे गटाला केवळ २० आणि शरद पवारांना १९ जागांवर समाधान मानावं लागत आहे, असे चित्र आत्ताच्या घडीला आहेा. अपक्षांनीही ८ जागांवर समाधान मानलं आहे, असा महाराष्ट्राचा कौल सध्या दिसत आहे. मनसेला एका जागेवर समाधान मानावे लागत असल्याचे चित्र सध्या आहे.
 
भाजपचे दिग्गज नेते सुरुवातीपासूनच आघाडीवर दिसत आहेत. नागपूर-दक्षिण पश्चिममधून देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत. तसेच एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, रविंद्र चव्हाण, अॅड. आशिष शेलार, गणेश नाईक, मंदा म्हात्रे, संजय केळकर, सुधीर मुनगंटीवार, मंगलप्रभात लोढा यांच्यासह महायुतीचे उमेदवार आघाडीवर दिसून येत आहेत. मुंबईत महायुतीला २० तर महाविकास आघाडीला ११ आणि इतर १ असा कौल मिळताना दिसत आहे. उत्तर महाराष्ट्रात महायुतीला ३६, मविआला २ तर इतर ३ असा कौल आहे. पश्चिम महाराष्ट्रात महायुती ४१, मविआलत १० तर इतर सात असा कौल आहे. तर ठाणे आणि कोकणात महायुतीला ३२, मविआला चार आणि अन्य तीन, असा कौल आहे.
 

Mahayuti
 
मराठवाड्यात ३५ तर मविआत नऊ इतर तीन, असा कौल देण्यात आला आहे. इथे मनोज जरांगे फॅक्टर हा पूर्णपणे फोल ठरल्याचे दिसून आले. राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटवण्यात मनोज जरांगेंनी अक्षरशः सत्ताधारी पक्षाला विशेषतः देवेंद्र फडणवीसांवर गलिच्छ भाषेत टीका केली. मात्र जनतेने आणि मराठा मतरादारांनी आपला कौल हा मतपेट्यांतून दाखवून दिला आहे. दरम्यान, हा निकाल आम्हाला मान्य नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना उबाठा खासदार संजय राऊतांनी दिली आहे. राज्यातील मविआतील नेत्यांनीही अशाच प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0