मुंबई : महाराष्ट्राच्या जनतेला माझा साष्टांग दंडवत आहे. मी महाराष्ट्राच्या जनेतेचे आभार मानते त्यांनी एकी दाखवली आहे. त्यांना माहिती नाही की आम्ही अधुनिक अभिमन्यू आहे. आम्ही त्यांना चक्रव्यूहात ओढू, असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले आहे. त्यांनी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत लाईव्हच्या माध्यमातून पत्रकारांसोबत संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक है तो सेफ असा नारा दिला होता. त्या नाऱ्याला मतदारांनी हिरवा कंदील दाखवला असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. सर्व समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन मतदान केले आहे. सर्वांनी मतदान करत आम्हाला विजयी केले असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. सर्वात आधी मी लाडक्या बहिणींचा, लाडक्या बांधवांचा आणि शेतकऱ्यांचे आभार मानतो. लाडक्या बहिणींनी आम्हाला मोठा अशिर्वाद दिला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत जो काही फेक नॅरेटिव्ह तयार करण्यात आला होता. त्या फेक नॅरेटिव्ह विरोधात आम्ही एका ताकदीने मैदानात उतरून राष्ट्रवादी संघटनांना एकत्र घेऊन आम्ही फेक नॅरेटिव्हला हाणून पाडले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
जाती-धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम केले जात होते. मात्र आता आम्ही असे कृत्य होऊ दिले नाही. आमच्या नेत्यांनी महायुती सरकारमधील असलेल्या मित्र पक्षांच्या जागांवर काम केले. जेव्हा आम्ही एकत्र एका ताकदीने उतरलो तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिले की, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच आहोत.
या विजयात माझे फारच छोटे काम आहे. पक्ष आणि आपल्या टीमने केलेले काम उल्लेखनीय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. महायुतीच्या या विजयामागे खरे कारण काय आहे त्यावर मला सल्ला द्यायचा नाही. त्याचे कारण त्यांनी शोधून काढावे, असे त्यांनी लाईव्ह पत्रकार परिषदेत सांगितले आहे.