काँग्रेसला धक्का! दिग्गज नेते पिछाडीवर

23 Nov 2024 10:31:54
 
Congress
 
मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कराड दक्षिणमधून काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण १६१० मतांनी पिछाडीवर आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या कलांनुसार, काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पिछाडीवर दिसत आहे.
 
हे वाचलंत का? -  काटोलमध्ये देशमुखांची सत्ता पालटणार? चरणसिंग ठाकूर आघाडीवर
 
शनिवारी सकाळापासूनच मतमोजणी सुरु आहे. यात महायूतीने तब्बल २१४ जागांवर आघाडी घेतली आहे, तर महाविकास आघाडी ५२ जागांवर पिछाडीवर आहे. दरम्यान, या सगळ्यात काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते सध्या पिछाडीवर आहेत. याशिवाय बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, अमित देशमुख हे नेतेदेखील पिछाडीवर गेले आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0