नागूपर : काटोल विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार चरणसिंग ठाकूर यांनी आघाडी घेतली असून शरद पवार गटाचे सलील देशमुख पिछाडीवर आहेत. दरम्यान, चरणसिंग ठाकूर यंदा देशमुखांची सत्ता पालटणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
हे वाचलंत का? - वांद्रे पश्चिममध्ये आशिष शेलारांची आघाडी कायम!
काटोल विधानसभा मतदारसंघ यावेळी चांगलाच चर्चेत होता. याठिकाणी सुरुवातीला शरद पवार गटाने माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, ऐन वेळेवर त्यांच्याऐवजी त्यांचे पुत्र सलील देशमुखांना तिकीट देण्यात आले. तर त्यांच्याविरोधात भाजपचे चरणसिंग ठाकूर मैदानात होते. दरम्यान, आतापर्यंत आलेल्या कलांनुसार, चरणसिंग ठाकूर २ हजार ९२८ मतांनी आघाडीवर आहेत.