मुंबई : वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते आशिष शेलार आघाडीवर असून त्यांनी २ हजार २१२ मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे आसिफ झकेरिया मैदानात होते. आतापर्यंत आलेल्या कलानुसार, महायूती १७३ जागांवर आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी १०१ जागांवर पिछाडीवर आहे.
हे वाचलंत का? - माहिममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर! काय घडतंय?
शनिवारी सकाळी ८ वाजतापासून विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, वांद्रे पश्चिममध्ये आशिष शेलारांना आतापर्यंत ४ हजार ५६३ मते मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या आसिफ झकेरिया हे २ हजार ४५१ मते घेत पिछाडीवर आहे. महायूतीमध्ये सध्या भाजपने सर्वात जास्त म्हणजेच १०३ जागांवर आघाडी घेतली आहे. तर शिवसेना ४५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस ३० जागांवर आघाडीवर आहे.