माहिममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर! काय घडतंय?

    23-Nov-2024
Total Views |
 
Amit Thackeray
 
मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून यावेळी पहिल्यांदाच निवडणूकीच्या रिंगणात असलेले मनसेचे अमित ठाकरे माहिममधून पिछाडीवर गेले आहेत. तर उबाठा गटाचे महेश सावंत सध्या आघाडीवर आहेत.
  
शनिवार दि. २३ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. माहिम विधानसभेत यंदा शिवसेना, उबाठा गट आणि मनसे अशी तिरंगी लढत होती. त्याच राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे माहिममध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवत असल्याने या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. दरम्यान, पहिल्या फेरीत अमित ठाकरे माहिममधून आघाडीवर होते. मात्र, आता उबाटा गटाच्या महेश सावंत यांनी त्यांना मागे टाकले आहे. आतापर्यंत आलेल्या कलानुसार, माहिममध्ये महेश सावंत पहिल्या तर शिवसेनेचे सदा सरवणकर दुसऱ्या क्रमांकावर आहेत.