तंत्रज्ञानस्नेही नवी राजधानी

22 Nov 2024 22:20:15
 
Nusantara
 
इंडोनेशियाने आपली राजधानी जकार्ता येथून ‘नुसंतारा’ या नवीन शहरात स्थलांतरित करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. जकार्ता ही इंडोनेशियाची राजधानी आणि सर्वात मोठे शहरी केंद्र. मात्र, जकार्ताचा भूभाग दिवसेंदिवस वेगाने जलमय होतोय. जकार्ताचा जवळपास ४०टक्के भूभाग आता समुद्रसपाटीच्या खाली आहे. पर्यावरण तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, जकार्ताचा एक तृतीयांश भाग २०५० सालापर्यंत जलमय होण्याची शक्यता आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी इंडोनेशियन सरकारने आपली राजधानी नुसंतारा या नवीन शहरात हलवण्याची योजना आखली आहे.
 
इंडोनेशियाने आपली राजधानी जकार्ता येथून ‘नुसंतारा’ या नवीन शहरात स्थलांतरित करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. जकार्ता ही इंडोनेशियाची राजधानी आणि सर्वात मोठे शहरी केंद्र. मात्र, जकार्ताचा भूभाग दिवसेंदिवस वेगाने जलमय होतोय. जकार्ताचा जवळपास ४०टक्के भूभाग आता समुद्रसपाटीच्या खाली आहे. पर्यावरण तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, जकार्ताचा एक तृतीयांश भाग २०५० सालापर्यंत जलमय होण्याची शक्यता आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी इंडोनेशियन सरकारने आपली राजधानी नुसंतारा या नवीन शहरात हलवण्याची योजना आखली आहे. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी ऑगस्ट २०१९ साली राजधानी पुनर्स्थापना करण्यास मान्यता दिली. त्सुनामी, भूकंप किंवा ज्वालामुखीचा उद्रेक यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्या कमी संवेदनशीलतेमुळे ‘पूर्व कालिमंतान’ हे नवीन ठिकाण राजधानी म्हणून निवडले गेले.
 
बोर्निओच्या पूर्व किनार्‍यावर २ लाख, ५०हजार हेक्टरपेक्षा जास्त पर्जन्यवन जमिनीवर वसलेले हे शहर हळूहळू पुढील दोन दशकांत प्रशासकीय केंद्र म्हणून जकार्ताची जागा घेईल. एका अहवालानुसार, या नव्या राजधानीच्या उभारणीस अंदाजे ३५अब्ज डॉलर्स इतका खर्च येईल, तर २०४५ पर्यंत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्याचे सरकारचे नियोजन आहे. हा संपूर्ण प्रकल्प हरित आणि पर्यावरण स्नेही असेल, यावर सरकार भर देत आहे. यासोबतच नवी राजधानीचे शहर हे अद्ययावत आणि तंत्रस्नेहीदेखील असेल. प्रामुख्याने अक्षय ऊर्जेचा वापर करून शहराला ऊर्जा देण्यासाठी सरकारने ‘स्मार्ट एनर्जी ग्रिड्स’ची योजना आखण्यात आली आहे. २०४५ सालापर्यंत ‘कार्बन न्यूट्रल’ होण्याचे इंडोनेशियाचे लक्ष्य आहे. वर्ष २०२४च्या सुरुवातीलाच याठिकाणी २१हजारांहून अधिक सौर पॅनेल उभारण्यात आले आहेत, तर रस्त्यावर इलेक्ट्रिक वाहने आणि स्वायत्त शटल तयार केले आहेत. या सर्वांवर ‘एआय’ प्रणालीद्वारे निरीक्षण केले जाते. ‘एआय’ प्रणालीद्वारेच कार्बन उत्सर्जन नियंत्रित ठेवत ही यंत्रणा रहदारीचे व्यवस्थापन करते. हे निरीक्षण ‘एकात्मिक कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर’ (ICCC)द्वारे केले जाणार आहे.
 
यासोबतच रहिवासी आणि व्यवसाय दोघांसाठी १०० टक्के डिजिटल होण्याचे आश्वासनदेखील नुसंतराला देण्यात आले आहे. इंडोनेशिया सरकारने घोषित केले आहे की, नुसंतराला त्यांच्या डिजिटल सेवांचा समाधानकारक दर ७५टक्क्यांहून अधिक असेल. इंडोनेशियात सरकारी मालकीच्या ‘ऑपरेटर टेलकॉम इंडोनेशिया’द्वारे डिजिटल कनेक्टिव्हिटी प्रदान केली जाते. ‘नुसंतारा’ (IKN) ‘प्राधिकरण राज्य विद्युत कंपनी’ (PLN) सोबत, आधीच ’५ जी’ नेटवर्क आणि ‘स्मार्ट सिटी’ उपकरणांसाठी पाया घालत आहे. १६०टाबाईट क्षमतेच्या विशाल ‘राष्ट्रीय डेटा सेंटर’ची योजना आखण्यात येत आहे.
 
‘आयओटी’ने ट्रॅफिक व्यवस्थापन, उर्जा वापर, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक सेवांसह विविध सेवांना जोडणे अपेक्षित आहे. सर्व ‘एआय’ सिस्टीम आणि ‘एम्बेडेड सेन्सर्स’द्वारे सूचित केल्या जातात. इंडोनेशियन प्राधिकरणाने स्मार्ट बिल्डिंग मार्गदर्शक तत्त्वे बनविली आहेत, ज्याद्वारे इमारतींच्या आत वैशिष्ट्यांमध्ये ऑटोमेशन आणि इमारतीच्या परिस्थितीचे निरीक्षण समाविष्ट आहे. स्व-अनुकूल वातानुकूलन आणि प्रकाश व्यवस्था, पावसाचे पाणी संकलन आणि पाण्याचा पुनर्वापर प्रणाली, स्पर्शरहित प्रवेशासाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण, रिमोट ऍक्सेससह व्हॉइस आणि व्हिडिओ इंटरकॉम सिस्टम, स्वयंचलित मीटर वाचन, सेन्सरच्या आधारित आपत्ती प्रतिसाद, इंटेलिजेंट व्हिडिओ प्रणालींद्वारे पाळत ठेवणे, तसेच स्मार्ट एस्केलेटर, ऑटोमेटेड वॉक-वे आणि पार्किंग सिस्टम अशा काही स्मार्ट अद्ययावत प्रणालींचा यात समावेश आहे. हे सर्व अंतिम टप्प्यावर असले, तरी इमारती आणि रहिवासी यांच्यातील संवाद स्मार्टफोन अ‍ॅपद्वारे होईल. यंदाच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये, प्राधिकरणाने त्याचे ’IKNOW’ हे स्मार्टफोन अ‍ॅप जारी केले. हे अ‍ॅप रहिवाशांना सार्वजनिक सेवांमध्ये प्रवेश करण्यास अनुमती देईल. शहर पूर्णपणे कार्यान्वित होईपर्यंत या उपाययोजनांची परिणामकारकता स्पष्ट होऊ शकत नाही. इतर अनेक देशांनी सुरुवातीपासून शहरे निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, नुसंतारा भविष्यातील लोकांसाठी ‘ब्लू प्रिंट’ ठरु शकते की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0