मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Sanatan Dharma Mandal) वक्फ बोर्डाची मनमानी पाहता सनातन धर्म मंडळ स्थापन करण्याची मागणी देशभरातून होत आहे. कथा निवेदक देवकीनंदन ठाकूर, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री पवन कल्याण, बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यासह अनेकांनी सनातन धर्म मंडळच्या स्थापनेबाबत मागणी केली होती. त्यानंतर आता प्रथमतःच किन्नर समाजाच्या भगवत कथा निवेदक महामंडलेश्वर स्वामी हिमांगी सखी मां यांनी सनातन धर्म मंडळ स्थापन करण्याची मागणी केली आहे.
हे वाचलंत का? : अफगाणिस्तानात इस्लामविरोधी पुस्तकांवर बंदी
आपली मागणी सरकारकडे मांडताना हिमांगी सखी मां म्हणाल्या की, "सनातन धर्म मंडळाची स्थापना खूप आधी व्हायला हवी होती, परंतु काहींच्या मुस्लिम तुष्टीकरणामुळे हे होऊ शकले नाही. मुस्लीम समाजासाठी वक्फ बोर्डाची स्थापना होऊ शकते तर हिंदूंसाठी सनातन बोर्ड का नाही, असा सवाल त्यांनी केला. सनातन धर्म मंडळ स्थापन झाल्यास ते मठ आणि मंदिरांचे संरक्षण करेल, असे हिंदू संत मानतात."
यासोबतच किन्नर समाजाचे लोक सनातन धर्म मंडळ स्थापन करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करत असल्याचेही स्वामी हिमांगी सखी मां यांनी म्हटले आहे. केरळमधील हिंदूंच्या धर्मांतराविरोधात आवाज उठवण्यासाठी २५ तारखेपासून राज्यात धर्मांतरविरोधी मोहीम राबवणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. हिमांगी सखी म्हणतात की, जगातील सर्व श्रद्धा आणि धर्मांमध्ये सनातन धर्म हा सर्वात जुना आहे. सनातन धर्माच्या अनुयायांचे धर्मांतर रोखण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.