मुंबई : एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी काही पत्रकारांशी संवाद साधत असताना एका पत्रकाराला थेट घटनास्थळावरून हकलवले आहे. एका पत्रकाराने इम्तियाज जलील यांना विचारलेल्या प्रश्नावर जलील आक्रमक झाले आहेत. असे अनेक युट्यूबर्स असतात. त्यांची किंमत आम्हाल माहिती आहे असे म्हणत त्यांनी संबंधित पत्रकारास घटनास्थळावरून जाण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
याप्रकरणाची माहिती आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर जलील यांचा तिळपापड होऊन ते लालबुंद झाले. आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी बाहेर काढा असे सांगितले. त्यांच्या सांगण्यावरून जलील यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बाहेर काढले.
तसेच अशीच एक घटना राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेत घडली होती. राहुल गांधी यांची २० नोव्हेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने राहुल गांधी यांच्यावरील आरोपांवर प्रश्न विचारले होते. त्यावर राहुल गांधी यांनी उत्तर न देता आपण भाजपचे आहात का? असा सवाल केला. त्यावर पत्रकारानेही प्रत्युत्तर देत सांगितले की, हा माझा प्रश्न नसून असे भाजपचे अनेक प्रश्न आम्ही विचारले आहेत.