सनातन हिंदू एकता यात्रेत दिग्विजय सिंहच्या मुलाचा सहभाग

21 Nov 2024 14:57:38

Hindu Ekta Yatra

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Sanatan Hindu Ekta Yatra)
बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या सनातन हिंदू एकता यात्रेला मध्य प्रदेशात सुरुवात झाली आहे. गुरुवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी निघालेली ही यात्रा बागेश्वर धाम पासून सुरु होऊन यात्रेचा शेवट ओरछा येथे होणार आहे. हिंदूंवर होत असलेले अत्याचार थांबवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचे ही यात्रा आयोज्त केल्याचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी म्हणले. या यात्रेत सहभागी होण्यासाठी माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचे पुत्र आणि काँग्रेसचे आमदार जयवर्धन सिंह हेही आज पोहोचले आहेत. ते म्हणाले, जातीवाद समूळ नष्ट करायचा असेल तर ही यात्रा आवश्यक आहे, तसेच संतांना सनातन मंडळ स्थापन करण्याची केलेली मागणीसुद्धा रास्त आहे.

हे वाचलंत का? : कै. मा. डॉ. चिं. ना. परचुरे स्मृति व्याख्यानमालेचे पुष्प सातवे ‘अहिल्यादेवी होळकर’ यांना अर्पण

जयवर्धन सिंह पुढे म्हणाले की, बागेश्वर बाबाना सुरुवातीपासूनच धन्यता लाभली आहे. आम्ही सर्व एकाच कुटुंबातून आलो आहोत, ज्यांनी पिढ्यानपिढ्या सनातन धर्माचे पालन केले आहे. आपल्या देशात अस्तित्त्वात असलेल्या जातीवादाच्या वरती उठून सर्व समाजांना थोडासा सन्मान दिला तरच समाजाचे भले होईल, हे काही प्रमाणात खरे आहे. भगवान श्रीकृष्णानेही हेच सांगितले होते की आपली कृती सर्वस्व आहे. आपण कुठे जन्मलो हे महत्त्वाचे नाही, आपल्या जीवनात आपली कृती काय आहे हे महत्त्वाचे आहे. आपल्या हिंदू धर्माची सुरुवात भारतातून झाली आहे, त्यामुळे भारत हे हिंदू राष्ट्र असेल हे साहजिक आहे आणि आपण हे नेहमीच मानत आलो आहोत.

सनातन हिंदू एकता यात्रेविषयी बाबा बागेश्वर म्हणाले की, हिंदूंवर अत्याचार होत असून ते थांबवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. संस्कृती जतन करण्यासाठी सनातन मंडळ आवश्यक आहे. सध्या हिंदू जातींमध्ये विभागले गेले आहेत. जातीनिहाय संघर्षात गुंतलेले हिंदू पोटजाती, बोली आणि भाषांमध्ये विभागले गेले आहेत. भारत तेव्हाच जगाचा नेता बनेल जेव्हा सर्वजण एकत्र येतील बांगलादेश, पश्चिम बंगाल आणि मणिपूरमधील हिंदूंची स्थिती पाहता हिंदू एकता खूप महत्त्वाची आहे. त्यांना जागृत करण्यासाठी ही यात्रा आहे. मुस्लिम आणि शीखांना या यात्रेत यायचे असेल तर आम्हाला काही अडचण नाही. कोणाला राष्ट्र घडवायचे असेल तर त्यांनी जरूर यावे.

Powered By Sangraha 9.0