कै. मा. डॉ. चिं. ना. परचुरे स्मृति व्याख्यानमालेचे पुष्प सातवे ‘अहिल्यादेवी होळकर’ यांना अर्पण

21 Nov 2024 14:51:02
 
ahilyadevi holkar
 
मुंबई : भारतीय इतिहास संकलन समिती, महाराष्ट्र पश्चिम प्रांत महिला इतिहासकार आयोजित कै. मा. डॉ. चिं. ना. परचुरे स्मृति व्याख्यानमालेचे पुष्प सातवे ‘अहिल्यादेवी होळकर’ यांना अर्पण केले जाणार आहे. रविवार २४ नोव्हेंबर रोजी रात्री ९:१५ वाजता ऑनलाइन पद्धतीने हा कार्यक्रम होणार आहे. डॉ. प्राची दामले या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्यात्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. ‘अहिल्याबाई होलकर : एक लोकोत्तर प्रशासक’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय असणार आहे. कागल येथील डी. आर. माने महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. नीला जोशी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत.
 
Powered By Sangraha 9.0