ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा क्षेत्रात २४४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
सरासरी ... टक्के मतदान - २३ नोव्हें.ला निकालाची प्रतिक्षा
20-Nov-2024
Total Views |
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा क्षेत्रातील २४४ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले. जिल्हयात ३८ लाख ४५ हजार ४२ पुरुष आणि ३३ लाख ८२ हजार ८८२ महिला असे एकुण ७२ लाख २९ हजार ३३९ मतदार असले तरी एकुण.... मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने जिल्हयात सरासरी ... टक्के मतदान झाले. मतदान ( Thane voting ) प्रक्रियेत क्वचित घोळ झाले, मात्र कडेकोट बंदोबस्तात कुठलेही गालबोट न लागता मतदान शांततेत पार पडले. दरम्यान, मतटक्का वाढल्याने २३ नोव्हे. रोजी लाडक्या मतदारांचा पुन्हा एकदा महायुतीलाच कौल मिळण्याचे संकेत विविध एक्झीट पोल आणि राजाकिय धुरीणांनी दिले आहेत.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा- माजिवाडा, मिरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, कल्याण ग्रामीण, कळवा-मुंब्रा, डोंबिवली, कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण पश्चिम, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, भिवंडी ग्रामीण, शहापूर आणि मुरबाड या १८ विधानसभा मतदारसंघात एकुण २४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा थेट लढती असल्या तरी पाच ठिकाणी मनसेही नशीब अजमावत आहे. महायुतीमध्ये भाजपने सर्वाधिक १० ठिकाणी उमेदवार दिले आहेत. यात १७ विद्यमान आमदार तर कल्याण पूर्व मध्ये विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्याऐवजी सौभाग्यवती लढत आहेत. या १८ पैकी नऊ विधानसभा मतदारसंघांत बंडखोर उभे असल्यामुळे तिरंगी, चौरंगी लढती होत आहेत. दरम्यान, कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उबाठाने स्व. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघेना उतरवल्याने येथील निकाल एकतर्फी लागण्याची चिन्हे आहेत. तर, डोंबिवली मतदार संघात भाजपचे रविंद्र चव्हाण, ठाणे शहरमध्ये भाजपचे संजय केळकर आणि ओवळा माजिवड्यात सेनेचे प्रताप सरनाईक पुन्हा एकदा बाजी मारण्यासाठी सज्ज झाले आहेत.