उद्धव ठाकरेंच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

ठाण्यातील भाषण भोवणार

    20-Nov-2024
Total Views |
Thacheray

ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शनिवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी ठाण्यात झालेल्या जाहीर सभेत उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thacheray ) यांनी जातीय आणि धार्मिक द्वेष पसरविल्याप्रकरणी शिवसेना पक्षप्रवक्ते दिलीप अलोणी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

उद्धव ठाकरे यांना अशी जाहीर वक्तव्ये करण्यावर निर्बंध लादण्यासह सहा वर्षांसाठी निवडणूक क्षेत्रात बंदी करावी, अशी मागणी अलोणी यांनी केली आहे. दरम्यान, या संदर्भात निवडणूक आयोगाने ठाणे निवडणूक विभागाला उद्धव ठाकरेंच्या संबंधित वक्तव्याचा २४ तासात अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी, ठाणे शहर, ओवळा-माजिवडा आणि कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचाराकरिता दि. १६ नोव्हेंबर रोजी गडकरी रंगायतन येथे सभा घेतली होती. या सभेतील भाषणात ठाकरे यांनी धार्मिक द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केला होता.